एक देश, एक निवडणूक प्रस्ताव किती व्यवहार्य? उल्हास बापट यांचं विश्लेषण
केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश एक निवडणुकी'चा प्रस्ताव स्वीकारला असून, त्यास मंजुरीही दिली, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पण कॅबिनेट मंजुरीनंतर आता 'एक देश, एक निवडणूक' संसदेत मंजूर व्हावं लागेल.घटनादुरुस्तीला राज्यांची मान्यता मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह आहेच. या प्रस्तावाबद्दल घटनातज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणतात?