IPL विजयोत्सव जीवावर कसा बेतला? पाहा बंगळुरूतून संपूर्ण घटनाक्रम
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाला, तर 33 लोक जखमी झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते. मग चेंगराचेंगरी कशी झाली?
पाहा मयुरेश कोण्णूर आणि शरद बढे यांना मध्यरात्री बंगळुरूतल्या त्या घटनास्थळी काय काय दिसलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)