शुभांशु शुक्ला : वडिलांची इच्छा मुलाने IAS व्हावं, पण ते बनले अंतराळवीर; उद्या झेपावणार अवकाशात

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे वडील शंभूदयाल शुक्ला आणि आई आशा शुक्ला
फोटो कॅप्शन, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे वडील शंभूदयाल शुक्ला आणि आई आशा शुक्ला
  • Author, सय्यद मोझेझ इमाम
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सीतापूर रोडवर त्रिवेणी नगर आहे. इथे राहणारे शंभूदयाल शुक्ला सध्या खूप आनंदी आहेत. त्यांनी कधीही असा विचार केला नव्हता की त्यांच्या मुलामुळे त्यांचं नाव संपूर्ण देशात होईल.

शंभूदयाल शुक्ला त्यांच्या मुलाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करत होते त्याच वेळी होत त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नी आशा शुक्ला यांच्या डोळ्यांत देखील मुलाच्या आगामी अंतराळ मोहिमेबाबतची उत्सुकता दिसत होती.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला लवकरच देशातील दुसरे अंतराळवीर बनणार आहेत. ते 10 जून रोजी 14 दिवसांच्या मोहिमेसाठी यूएस स्पेस सेंटरमधून निघणार होते. परंतु आता 11 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) निघतील.

त्यांचे वडील शंभूदयाल शुक्ला यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा त्यांचा मुलगा सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नाची माहिती नव्हती.

खरंतर, शंभूदयाल यांना शुभांशु IAS व्हावे असं वाटत होतं. पण शुभांशु यांनी आपल्या करिअरची वाट स्वतः निवडली आणि ते NDA मध्ये गेले.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले