कर्करोगामुळे महिलेला काढावे लागले आठ अवयव, स्वत:च्या अंत्यविधीची केली होती तयारी

ट्युमर फाटल्यामुळं कॅन्सरच्या पेशी त्यांच्या शरीरात पसरायला सुरुवात झाली होती.

फोटो स्रोत, Faye Louise

फोटो कॅप्शन, ट्युमर फाटल्यामुळं कॅन्सरच्या पेशी त्यांच्या शरीरात पसरायला सुरुवात झाली होती.
  • Author, क्रिस्टियन फुलर
  • Role, बीबीसी न्यूज

एका दुर्मीळ कर्करोगाच्या निदानानंतर उपचारात महिलेला तिचे जवळपास आठ अवयव काढून टाकावे लागेल. पण आता ही महिला उपचारानंतर पुन्हा कामावर परतली आहे.

वेस्ट ससेक्सच्या होर्शाममधील फे लुईस यांच्या ॲपेंडिक्समध्ये ट्युमर असल्याचं 2023 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती एवढी ढासळली की, त्यांनी स्वतःच्या अंत्यविधीची तयारीही सुरू केली होती.

पण नंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर आता पुन्हा कॅन्सरमुक्त होऊन कामावर परतल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गॅटविक विमानतळावर त्या फ्लाईट डिस्पॅचर म्हणून काम करतात.

"माझ्या शरीरातून हा आजार पूर्णपणे निघाला असून शरीरात कॅन्सरच्या पेशी नसल्याचं ऐकणं हे माझ्यासाठी सर्वांत मोठं ख्रिसमस गिफ्ट होतं," असं त्या म्हणाल्या.