नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या राजकारणातले 5 मुलभूत फरक

मोदी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाजपेयींनीच आपल्याला राजकारणाचं बाळकडू पाजल्याचं मोदी त्यांच्या बोलण्यातून सांगत असतात.
  • Author, गणेश पोळ
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Twitter,

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच त्यांच्या पंतप्रधानपदाची 10 वर्षं पूर्ण करणार आहेत. नरेंद्र मोदींची तुलना वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या वेळी त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांबरोबर होत आली आहे.

इंदिर गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींबरोबर त्यांची तुलना अनेकदा होताना आपण पाहातो.

अटलबिहारी वाजपेयी तसे नरेंद्र मोदींसाठी वडिलधाऱ्या ठिकाणी असलेले नेते. देशाला लाभलेल्या भाजपच्या या 2 पंतप्रधानांच्या राजकारणाचा बाज बऱ्याचदा काही साम्यस्थळी येऊन थांबतो. तर कधीकधी ही दोन केंद्रकं पूर्णपणे वेगळ्या दिशेला गेलेली दिसून येतात.

या लेखात आपण अशा 5 मुद्द्यांचा परामर्श घेणार आहोत.

"मी निःशब्द आहे. मी शून्यात आहे. पण माझ्या भावना उचंबळून आल्या आहेत. आपल्या सर्वांचे प्रार्थनीय अटलजी आपल्याला सोडून गेलेत. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यांचं निघून जाणं एका युगाचा अंत आहे."

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले