बोधिचित्त वृक्ष : सशस्त्र दरोडेखोरांनी रात्रीत झाड कापलं, या झाडाची किंमत कोट्यवधींच्या घरात का आहे?

फोटो स्रोत, Samip Tripathy
- Author, संजय धाकल
- Role, बीबीसी न्यूज नेपाळ
कोट्यवधींची किंमत असलेलं एक वृक्ष उद्ध्वस्त झाल्यानं नेपाळमधील एका समूहाच्या भावना दुखवाल्या आहेत, त्यांना वेदना झाल्या आहेत. त्यांचं हे दु:खी होणं भीतीचंही कारण ठरलंय.
या भागातील बहुतांश लोकांसाठी बोधिचित्त (किंवा बोधि) या वृक्षापासून मिळणारं उत्पन्न संपूर्ण जीवन बदलून टाकणारं ठरलंय. त्यामुळे कठोर शारीरिक श्रमातून त्यांची सुटकाही झाली.
नेपाळच्या कावरेपालनचोक जिल्ह्यात आढळणाऱ्या बोधिचित्त वृक्षाचं बौद्ध धर्मात मोठं प्रतिकात्मक महत्त्वं आहे. पण त्याचबरोबर त्याची किंमतही सोन्यापेक्षा जास्त आहे.
त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कावरेमधील रोशी ग्रामीण नगर पालिका हद्दीतल्या एका वृक्षाची चोरी झाली, त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना आपण सर्वकाही गमावून बसू की काय? अशी भीती निर्माण झाली.

वृक्ष बनलं सोन्याची खाण
"त्यांना काही अडचण होती, तर त्यांनी माझ्याशी सामना करायचा होता. त्यांनी वृक्ष कापण्याची काय गरज होती");