118 मुलांना दत्तक घेणाऱ्या ‘लव्ह मदर’ला का जावं लागलं तुरुंगात?

फोटो स्रोत, WEIBO
'लव्ह मदर' म्हणून चीनसह जगभरात नावाजलेल्या ली यांक्झिया या महिलेला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 118 चिमुकल्यांना दत्तक घेतल्यानंतर 54 वर्षीय ली यांक्झिया प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
खंडणी, फसवणूक, कट रचणे आणि सामाजिक अशांतता निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये ली यांक्झिया दोषी आढळली. त्यानंतर चीनमधील हेबेई प्रांतातील वुआन कोर्टाने तिला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तिला 20 लाख 67 हजार युआन (सुमारे 2 कोटी 65 लाख 18 हजार रुपये) इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.
ली यांक्झिया आणि तिच्या मित्रासह इतर 14 जणांना या प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं आहे.